Budh Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राजकुमाराचे स्थान बुध ग्रहाला आहे, नऊ ग्रहांपैकी एक असलेला बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्कशास्त्र, गणित, संवाद, हुशारी, भाषण, संवाद आणि मैत्री इत्यादींसाठी जबाबदार आहे. बुध ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. त्यानंतर नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा सर्व बारा राशींवर परिणाम होतो. व्यवसायाचा दाता बुध ग्रह २१ मे, बुधवारी रात्री १०:२३ वाजता कृतिका नक्षत्रात भ्रमण करणार आहे. कृतिका नक्षत्रावर सूर्य देवाचे अधिराज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. अशा स्थितीत बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. यामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात…
‘या’ राशींना धनलाभ होण्याची संधी!
वृषभ
कृतिका नक्षत्रात बुध ग्रहाचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रमोशन किंवा नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या मंडळींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. वाहने आणि मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, परदेश प्रवासाची शक्यता असेल. विवाहित लोकांचे त्यांच्या सासरच्या लोकांशी संबंध सुधारु शकतात. आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी नशिबाचे दार ठोठावू शकतात.
सिंह
बुध ग्रहाचे नक्षत्रातील बदल सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरु शकतं. या लोकांना काही मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाच्या नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरु शकतो. परीक्षेत-स्पर्धेत यश मिळू शकते. रखडलेली काम मार्गी लागू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतो. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी वेगवान आणि सकारात्मक घडामोडींचा ठरेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे नक्षत्र बदल शुभ ठरू शकते. व्यवयासात तगडा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकदारांना फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. व्यावसायिकांना हा कालावधी चांगला नफा देऊ शकतो. या काळात तुम्हाला ठराविक वेळेनुसार धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होताना दिसू शकतात. या काळात वाहन खरेदीचेही योग आहेत. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळू शकतो. धार्मिक कार्यात तुमची चांगली रुची वाढलेली दिसेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)