Budh Grah Uday Mithun Rashi Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर, राशी परिवर्तन व नक्षत्र बदल करत असतो. यानुसार राशीचक्रातील प्रत्येक राशीवर शुभ-अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. यंदाच्या ग्रहमालेतील राजापदी असणारे बुध देव हे उदित होणार आहेत. बुद्धी, धन, व्यापार व वाणीचा कारक बुध देव ८ जून २०२५ रोजी उदयस्थितीत येणार आहे. बुधाचा मिथुन राशीत उदय होईल. बुध उदय काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. बुध देवाच्या उदयाने या राशींच्या भाग्याचे दार उघडण्याची शक्यता आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..
‘या’ राशी कमावतील बक्कळ पैसा, चौफेर होईल धनलाभ?
मिथुन
बुधाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मिथुन राशीत बुधाचा उदय होणार आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. यावेळी तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला विविध क्षेत्रातील गुंतवणुकीतून प्रचंड नफा मिळू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक आणि मानसन्मान प्राप्त होऊ शकतो. यातूनच नोकरीत बढतीसुद्धा होण्याचा योग जुळून येत आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ असू शकतो. बुध उदयामुळे तुमच्या आतापर्यंतच्या कष्टांचे फळ प्राप्त होऊ शकते. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक, वैवाहिक आणि करिअरच्या बाजूनेसुद्धा फायदाच-फायदा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुमचं उत्पन्नही वाढू शकतं. या काळात नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढून व्यावसायिकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये पैसे कमविण्याची संधी मिळू शकते.
मकर
बुधाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापार-उद्योगात मोठे प्रकल्प हाती लागून आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, त्यातून मोठा आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतो. ज्या लोकांची पदोन्नती अनेक काळापासून रखडलेली आहे, त्यांना चांगली बातमी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)