Budh Uday In Cancer: रक्षाबंधन २०२५ या वर्षी एक खास योग जुळून येत आहे. जिथे बहीण-भावाच्या प्रेमाचा सण साजरा केला जातो, तिथेच ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठा बदल होणार आहे. ९ ऑगस्टच्या दिवशी, ज्याच दिवशी रक्षाबंधन आहे, व्यापार, वाणी आणि बुद्धीचे कारक बुध ग्रह उदयाला येणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी काही निवडक राशींसाठी हा काळ अक्षरशः ‘लॉटरी’सारखा ठरणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी पाहूयात…
बुधाच्या शुभ उदयानं ‘या’ राशींवर धनसंपत्तीचा वरदहस्त?
कन्या
बुध ग्रह आपल्या राशीच्या ११व्या स्थानात उदय होणार असल्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नात वाढ, नवीन आर्थिक संधी, शेअर बाजार किंवा सट्ट्यामुळे नफा, आणि करिअरमध्ये सन्मानासह प्रगती मिळण्याची शक्यता आहे. यावेळी संतानसौख्याचा शुभवार्ता मिळू शकते. ज्या योजना आजवर रखडल्या होत्या, त्यात अचानक यश मिळू शकतं. आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी नशिबाचे दार ठोठावतील. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभाचीही पूर्ण शक्यता आहे.
कर्क
बुध ग्रह कर्क राशीच्या लग्नस्थानी उदय होणार असल्यामुळे, वैयक्तिक जीवनात आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल. विवाहितांच्या नात्यात प्रेम वृद्धिंगत होईल. व्यावसायिक भागीदारीत यश आणि न्यायालयीन बाबतीत तुमच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैसे कमविण्याच्या संधी मिळू शकतात. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. यामुळे प्रतिष्ठा आणि सामाजिक मानही वाढेल. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते. या राशीच्या मंडळींचे दांपत्य जीवन सुखी राहील.
तूळ
बुध ग्रह तूळ राशीच्या कर्मभावात उदय होत असल्याने, करिअरमध्ये नवे टप्पे पार करता येतील. नवीन नोकरी, प्रमोशन, मोठ्या प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठे ऑर्डर्स, नवे पार्टनरशिप डील्स मिळू शकतात. वडिलांशी संबंध घट्ट होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा फार चांगली असू शकते. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
या राशींच्या लोकांनी ९ ऑगस्टपासून आपल्या आयुष्यात येणाऱ्या या चमत्कारांना ओळखून योग्य निर्णय घ्यावेत. ग्रहांची कृपा मिळाली तर कोणतंही स्वप्न अशक्य राहत नाही…
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)