Mangal Gochar In Kanya: वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती मानला जाते. तसेच मंगळ हा भूमीचा पुत्र आहे, तसेच मंगळ देव ऊर्जा, भाऊ, जमीन, शक्ती, धैर्य, शौर्य, शौर्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळाच्या चालीत बदल होतो. तेव्हा या क्षेत्रांवर त्याचा विशेष परिणाम दिसून येतो. अशातच आता मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला असून तो ३ ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहणार आहे. त्यामुळे काळात ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तर या ३ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.
मीन रास (Meen Zodiac)
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचा कन्या राशीत प्रवेश होणं फायदेशीर ठरू शकतं. कारण मंगळ तुमच्या राशीतून सातव्या स्थानी भ्रमण करत आहे. त्यामुळे विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहू शकते. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळू शकते. तर जे अविवाहित आहेत, त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मंगळ तुमच्या राशीत धन आणि भाग्याचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच तुम्हाला अचानक पैसे मिळण्याचीही शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
कन्या राशीत मंगळाचा प्रवेश तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या गोचर कुंडलीतील उत्पन्नाच्या स्थानी प्रवेश करत आहे. तसेच मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. शिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, मंगळ तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. या काळात तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात यशस्वी होऊ शकता. शिवाय तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर रास (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने मंगळाचा राशी बदल शुभ ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून नवव्या स्थानी भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. तसेच, स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट ठरू शकतो. ते कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या घरात किंवा कुटुंबात एखादा धार्मिक, शुभ कार्यक्रम होऊ शकतो. तर तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा खूप चांगली होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)