Chaitra Navratri Maha Ashtami 2024: चैत्र नवरात्रीतील सर्वात महत्त्वाची अशी महाअष्टमी तिथी आज असणार आहे. अष्टमीच्या दिवशी अनेक ठिकाणी कन्या पूजन व होमहवन करण्याची पद्धत आहे. या दिवशी माता दुर्गा कन्येच्या रूपात भक्तांच्या भेटीस येऊन त्यांना आशीर्वाद देते असं म्हणतात. आजच्या या शुभ तिथीला ग्रहांच्या स्थितिनुसार व पंचांगाच्या माहितीनुसार काही दुर्लभ योग सुद्धा तयार होत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज महाष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग तयार होत आहेत. अष्टमीच्या दिवशीच हे योग बनल्याने पुढील वर्षभर टिकेल असा लाभ काही राशींना होऊ शकतो. महाअष्टमीपासून या राशींचा सुवर्ण काळ सुरु होईल असं म्हणायला हरकत नाही. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

महाअष्टमीपासून ‘या’ ५ राशींना माता दुर्गा करेल श्रीमंतीचे धनी

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या मंडळींना १६ एप्रिलपासून अच्छे दिन अनुभवता येणार आहेत. आपल्या कुंडलीत धनलाभाचे प्रबळ योग निर्माण होत आहेत. अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात त्यामुळे डोक्यावरील ताण बाजूला होईल. संपत्तीत वाढ होण्यासाठी पूर्व गुंतवणुकीचे मोठे योगदान असेल. दानातून पुण्य लाभेल. तुमच्या उर्जेला वेगळीच गती लाभू शकते.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

महाअष्टमीला तयार होणारे योग हे तुमच्या राशीला करिअरसाठु लाभदायक ठरणार आहेत. आर्थिक मिळकत वाढीस लागेल. नवीन लोकांशी गाठीभेटी होतील ज्यांच्या रूपात आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश घेणार आहे. माता दुर्गा तुमच्या हस्ते इतरांची मदत घडवून आणू शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद व समाधान अनुभवता येऊ शकते.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या मंडळींना आयुष्यात वेग व स्थैर्य दोन्ही एकाच वेळी अनुभवण्याची संधी देणारा असा हा कालावधी असणार आहे. आपल्याला मान- सन्मान मिळेल असे एखादे काम पूर्ण होईल. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या दूरच्या प्रवासाची संधी मिळू शकते. ऊर्जा टिकून राहील. तुमच्या बुद्धी चातुर्यात भर पडेल या माध्यमातून आपण शत्रूंवर मात करू शकाल.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीच्या मंडळींना हा शुभ योग व दिवस धन- संपत्ती देऊन जाईल. पुढील वर्षभराच्या संकटांना व चिंतांना हलके करेल इतका लाभ या कालावधीत आपल्याला होऊ शकतो. करिअरमध्ये मोठा बदल घडवण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळू शकते. आपल्या जवळच्या मंडळींशी नाती घट्ट होतील.

हे ही वाचा<< Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मीन राशीच्या मंडळींना हा शुभ योग म्हणजे एकार्थी आश्चर्याचा धक्का असणार आहे. तुम्हाला अचानक पैसे व प्रेम वाढताना दिसेल. तुम्ही स्वतः भारावून जाल इतकी प्रगती या कालावधीत तुमच्या नशिबात लिहिलेली आहे. हुरळून जाऊ नका व कष्ट करत राहा. या महाअष्टमीपासून संपूर्ण वर्षभर तुमच्या प्रगतीची व भरभराटीची चिन्हे आहेत. आर्थिक समस्या दूर होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)