Chanakya Neeti’s Tips for a Successful Marriage : लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. खरं तर चांगला जोडीदार मिळणे, नशीबाचा भाग आहे पण स्वत:साठी योग्य जोडीदार शोधणे खूप कठीण काम आहे. पण चाणक्य यांच्या मते, योग्य जोडीदार निवडण्यासाठी काही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. चाणक्य सांगतात की लग्नापूर्वी जोडीदाराविषयी या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहीन.
कुटुंब – लग्नापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जोडीदार कुटुंबाला किती महत्त्व देतो. कुटुंबातील सदस्यांबरोबर जोडीदार कसा वागतो, हे सुद्धा जाणून घेतले पाहिजे
संयम – चाणक्य सांगतात की संयम ठेवणारी व्यक्ती आयुष्यात कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाते. संकटाच्या वेळी खूप खंबीरपणे उभी राहते, त्यामुळे लग्नापूर्वी आपल्या जोडीदारामध्ये संयम आहे की नाही, हे नक्की जाणून घ्यावे.
राग – लग्नापूर्वी जोडीदाराचा स्वभाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: त्याच्या रागाविषयी जाणून घ्या. रागामुळे नाते तुटते. रागीट व्यक्ती चांगल्या आणि वाईट गोष्टीतील फरक विसरतो. रागाच्या भरात तो जोडीदाराला दुखवू शकतो.
गोड संवाद – नात्यात घट्ट करायचे असो किंवा तोडायचे, पती पत्नीच्या आयुष्यात गोडवा असणे आवश्यक आहे. गोड संवादाने वैवाहिक आयुष्य आणखी फुलतं पण जोडीदाराला खोचक शब्दात बोलायची सवय असेल तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
संस्कार – जोडीदार निवडताना बाह्य सौंदर्य बघण्यापेक्षा व्यक्तीच्या गुणांना महत्त्व द्या. त्यांच्या विचारांना आणि संस्कारांना महत्त्व द्या. कारण संस्कारी व्यक्ती लग्नानंतर आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही. प्रत्येक वाईट परिस्थितीत ठामपणे बरोबर राहतो.
जोडीदाराचा स्वभाव समजून घ्या – आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला योग्य जोडीदार निवडायचा असेल तर त्याचा स्वभाव जाणून घ्या. लग्न करताना सौंदर्य महत्त्वाचे नाही, स्त्री आणि पुरुष यांचा स्वभाव आणि गुण बघणे महत्त्वाचे आहे.
कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका- चाणक्य सांगा की जोडीदार निवडताना कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे खूप विचार करून निर्णय घ्यावा. दबावाखाली घेतलेल्या निर्णयानंतर लग्न हे इच्छा नसताना निभावावे लागते आणि वेळोवेळी तडजोड करावी लागते.