आचार्य चाणक्य हे केवळ अर्थशास्त्रज्ञ किंवा राजकारणी नव्हते, तर ते एक विचारवंतही होते. त्यांच्या ‘चाणक्य नीती’त जीवनातील प्रत्येक पैलूवर सखोल विचार आढळतो. त्यांनी केवळ राजकारण आणि नीतीच नाही, तर मुलांच्या संस्कार आणि संगोपनाबद्दलही अमूल्य मार्गदर्शन दिलं आहे. चाणक्यांच्या मते, वडिलांच्या काही चुकीच्या सवयी आणि निर्णयांमुळे मुलाच्या चारित्र्य, आत्मविश्वास आणि भविष्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
१. मुलाचा अति लाड करू नका (Do not Overpamper the Son)
चाणक्य सांगतात, वडीलांनी मुलांवर प्रेम दाखवणं आवश्यक आहे, पण मुलांवर अंधाळे प्रेम करणे आणि प्रत्येक मागणी पूर्ण करणं धोकादायक ठरू शकतं. अति लाडामुळे मुलं हट्टी आणि स्वार्थी बनतात. त्यांना शिस्त, जबाबदारी आणि संयम शिकवणं हे वडिलांचं कर्तव्य आहे.
२. प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप टाळा (Avoid Interfering in Every Decision)
मुलगा मोठा झाल्यावर त्याला स्वत:चे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या. सतत सल्ला देणे किंवा त्याच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करणं त्याचा आत्मविश्वास कमी करते. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. हे चाणक्यांनी स्पष्ट केलं आहे.
३. संस्कार आणि नैतिकतेची शिकवण द्या (Teach Moral Values and Ethics)
चाणक्यांच्या मते, ज्ञान आणि करिअरपेक्षा महत्त्वाचे आहेत — चांगले संस्कार. मुलाला प्रामाणिकपणा, करुणा, संयम आणि आदर्श जीवनशैलीची शिकवण दिल्यास तो समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून उभा राहतो.
४. मुलाच्या मतांचा आदर करा (Respect the Child’s Opinions)
बर्याचदा पालक आपल्या मुलाच्या मतांना गांभीर्याने घेत नाहीत. पण चाणक्य सांगतात की, प्रत्येक मुलामध्ये अनुभवाबरोबर परिपक्वता येते. त्याला निर्णय घेऊ द्या, चुका करू द्या आणि त्यातून शिकू द्या — हीच खरी शिकवण आहे.
५. मुलाच्या गुणांचा दिखावा करू नका (Do Not Publicly Flaunt the Child’s Talents)
आपल्या मुलाचं कौतुक करणं चांगलं, पण त्याचा सार्वजनिकठिकाणी अति कौतुक करणे टाळावे. त्यामुळे इतरांमध्ये ईर्षा आणि नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. प्रशंसा खासगी पातळीवर करा आणि मुलाला नम्र राहण्याची शिकवण द्या.
(टीप -वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
