Chanakya Niti : आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. त्यांनी यशस्वी, आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. त्यांच्या नीतीचे अनेक जण आजही अनुकरण करतात. इतरांना मदत करावी, असे अनेक जण आवाहन करतात पण चाणक्य यांनी तीन लोकांना चुकूनही मदत करू नये, असे सांगितले आहेत.
अनेकदा आपण चांगल्या वाईट गोष्टींचा विचार न करता कुणालाही मदत करतो पण अनेकदा आपला हा चांगुलपणा आपल्यावरच पश्चातापाची वेळ आणतो. चाणक्य यांनी सांगितलेले ही तीन लोकं कोणती, चला तर जाणून घेऊ या.

व्यसन करणाऱ्या लोकांची मदत करू नये

चाणक्य सांगतात की व्यसन करणाऱ्या लोकांची चुकूनही मदत करू नये. असे लोकं कधी तुम्हाला मदत मागतील तर त्यांना थेट नाही म्हणा. कारण असे लोकं व्यसनाच्या नादात सर्वकाही विसरतात आणि यांना पैशांची सुद्धा किंमत नसते. नशेत असताना हे लोकं कुणालाही नुकसान पोहचवू शकतात. चाणक्य यांच्या मते, या लोकांना चांगले वाईट याच्यातील फरक कळत नाही. त्यामुळे अशा लोकांची मदत करू नये.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

हेही वाचा : Love Horoscope : डिसेंबर महिन्यात ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येऊ शकते प्रेम! अविवाहित व्यक्तींसाठी येईल चांगले स्थळ

वाईट व्यक्तिमत्त्व असणाऱ्या लोकांना मदत करू नये

चाणक्य सांगतात, ज्या लोकांचे व्यक्तिमत्त्व चांगले नाही त्यांच्यापासून दूर राहणे, नेहमी योग्य असते. अशा लोकांना मदत करू नये. अशा लोकांची मदत केल्यामुळे तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता.त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

दु:खी लोकांना कधीही मदत करू नये

चाणक्य यांच्या मते, जे लोक जीवनात समाधानी नसतात ते नेहमी दु:खी असतात.या लोकांना मदत करुन आपल्या वाटेला पण दु:ख येतं. या लोकांचे आयुष्य कितीही चांगले असो ते नेहमी दु:खी राहतात. त्यांना इतरांचे सुख बघवत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे, कधीही चांगले आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)