Chanakya Niti: एक महान शिक्षक, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही तितक्याच प्रासंगिक आहेत. चाणक्य म्हणतात की, जीवनात यश, समृद्धी आणि आनंद मिळविण्यासाठी केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाहीत तर योग्य निर्णय आणि योग्य ठिकाणी राहणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यांचा असा विश्वास होता की,जर एखाद्या व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याच्या इच्छा असूनही तो आनंदी जीवन जगू शकत नाही आणि आयुष्यभर गरिबीशी झुंजत राहतो. अशा परिस्थितीत, आचार्य चाणक्य यांच्याकडून जाणून घेऊया अशा ठिकाणांबद्दल जिथे लोक राहतात आणि कधीही प्रगती करत नाहीत.
चाणक्य नीतिच्या पहिल्या अध्यायातील ९ व्या श्लोकात, चाणक्य अशा पाच परिस्थिती किंवा ठिकाणांबाबक सांगातात, जिथे व्यक्तीचे जीवन सतत संघर्ष आणि गरिबीने वेढलेले असते.
श्लोक –
धनिकः श्रोत्रियो राजा नाडी वैद्यस्तु पंचमः ।
पंच यत्र न विद्यान्ते न तत्र दिवसे वसेत् ।
याचा अर्थ असा की जिथे या पाच गोष्टी नसतील तिथे एक दिवसही राहू नये – विद्वान ब्राह्मण, श्रीमंत माणूस (व्यापारी), राजा किंवा सरकार (प्रशासन), नदी (जलस्रोत) आणि वैद्य (डॉक्टर).
चाणक्य यांच्या मते, अशा ठिकाणी कधीही राहू नये
जिथे विद्वान ब्राह्मण नाही तिथे राहू नका
चाणक्य यांच्या मते, ज्या ठिकाणी वेद जाणणारे आणि धर्माचे पालन करणारे ब्राह्मण राहत नाहीत, तिथे धर्माचा अभाव असतो. अशा ठिकाणी धार्मिक आणि नैतिक मूल्यांचा अभाव असतो, ज्यामुळे समाजात अज्ञान आणि अशांतता निर्माण होते. असे वातावरण व्यक्तीच्या विकासात अडथळा आणू शकते.
जिथे कोणी श्रीमंत किंवा व्यापारी राहत नाही तिथे राहू नका
चाणक्य नितीनुसार, ज्या ठिकाणी व्यवसाय होत नाही तिथे आर्थिक प्रगती शक्य होत नाही. चाणक्य सांगतात,” अशा ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागासलेली राहतात आणि तेथील लोकांचे जीवन कठीण होते.
जिथे योग्य राजा किंवा प्रशासन नसते तिथे राहू नका
चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या ठिकाणी सुशासन नसेल तर तिथे अराजकता, गुन्हेगारी आणि असुरक्षिततेचे वातावरण असते. चाणक्यांचा असा विश्वास होता की प्रशासनाचा अभाव लोकांना सुरक्षितता आणि संधींपासून वंचित ठेवतो, ज्यामुळे जीवन कठीण आणि वेदनादायक बनते.
जिथे नदी किंवा पाण्याचा स्रोत नाही तिथे राहू नका
पाणी हे जीवन आहे… जिथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत नाही तिथे राहणे कठीण होते. अशा भागात शेती आणि दैनंदिन जीवन दोन्ही प्रभावित होतात. चाणक्य सांगतात की, पाण्याची कमतरता असलेला प्रदेश जीवनासाठी योग्य नाही.
जिथे डॉक्टर नाही तिथे राहू नका
आरोग्य हा जीवनाचा आधार आहे… जर एखाद्या ठिकाणी वैद्य किंवा डॉक्टर उपलब्ध नसेल तर कोणत्याही आजाराच्या बाबतीत जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून, अशा ठिकाणांना टाळावे.