Chanakya Niti : प्राचीन भारतीय संस्कृत साहित्याच्या इतिहासात आचार्य चाणक्य हे अत्यंत प्रसिद्ध असे राजनीतीचे पंडित होते. चंद्रगुप्त मोर्य जेव्हा शासक होते, त्यावेळी चाणक्य हे राजनीतीचे गुरू होते. ते राजकारणात पारंगत होते. चाणक्यांचे जन्मनाव विष्णुगुप्त होते आणि चणक नावाच्या आचार्याचे ते पुत्र असल्याने त्यांचे नाव चाणक्य असे पडले. कुटिल राजनितीमध्ये पारंगत असल्याने त्यांना कौटिल्य सुद्धा म्हणत. आज अनेकांसाठी चाणक्यांचे विचार व नीती या ज्ञानामृत आहेत. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीद्वारे राजनैतिक, सामाजिक, आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या नीती जीवन जगण्याची कला शिकवतात.

आजही अनेक जण आचार्य चाणक्य यांच्या नीती फॉलो करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये आर्थिक, राजकीय व्यवहारापासून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक मोठे राजकारणी सुद्धा चाणक्य यांना आपला आदर्श मानतात.
चाणक्य नीतीमध्ये चाणक्य यांनी स्त्रियांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. ते मानतात की सृष्टीच्या रचनेत स्त्रीचे योगदान मोलाचे आहे. महिला पुरुषांच्या कोणत्या सवयी लक्षात घेतात, याविषयी त्यांनी सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

१. ‘चाणक्य नीती’नुसार प्रामाणिक पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात त्यामुळे प्रामाणिक पुरुष महिलांना आवडतात. पुरुषांचा प्रामाणिकपणा महिलांच्या लगेच लक्षात येतो.

२. चाणक्य सांगतात, इतर लोकांबरोबरची एखाद्या पुरुषाची वागणूक कशी आहे, याकडे महिलांचे लगेच लक्ष जाते त्यामुळे इतरांबरोबर प्रेमाने वागणारे पुरुष महिलांना आवडतात. चाणक्य नीतीनुसार, जर एखादा पुरुष नेहमी इतरांना मदत करीत असेल किंवा नम्रतेने वागत असेल तर अशा पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात.

३. असे म्हणतात की महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त बोलतात. त्यामुळे त्यांना ऐकणारे पुरुष नेहमी आवडतात. चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे जे पुरुष महिलांचे ऐकून घेतात त्याच पुरुषांबरोबर महिला जास्तीत जास्त गोष्टी शेअर करतात.