Chandra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. त्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. जून महिन्याला नुकतीच सुरूवात झाली असून या महिन्यामध्येही अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. पंचांगानुसार, रविवारी रात्री ९ वाजून ३६ मिनिटांनी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते शिवाय हा ग्रह दर अडीच दिवसाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.

‘या’ तीन राशींवर असणार चंद्राची कृपा

वृषभ (Vrushabh Rashi)

हे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी लाभकारी ठरेल. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

चंद्राचा सिंह राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा सिंह राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)