Chandra Grahan 2026: हिंदू धर्मात ग्रहण खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. ग्रहण काळात कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केले जात नाही. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि अन्नपाणी ग्रहण करण्यास मनाई असते. हा काळ गर्भवती महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. या काळात केवळ देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करावा, असे मानले जाते. त्यामुळे ग्रहणाचे वाईट प्रभाव कमी होऊन, मानसिक शांती मिळते. नुकतेच ७ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील दुसरे व शेवटचे चंद्रग्रहण संपले. ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजून ५८ मिनिटांपासून मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत हे ग्रहण होते. दरम्यान, आता २०२६ मधील चंद्रग्रहण कोणत्या दिवशी लागेल? हे आपण जाणून घेऊ
२०२६ मध्ये कधी लागणार चंद्रग्रहण?
२०२६ या वर्षामध्ये दोन चंद्रग्रहण असतील. पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात लागेल; तर दुसरे चंद्रग्रहण ऑगस्ट महिन्यात लागेल.
२०२६ मधील पहिले चंद्रग्रहण
पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमेला मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी लागेल. हे एक आंशिक चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसेल. हे संध्याकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी सुरू होणार असून, ते संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होईल. या ग्रहणाचा कालावधी केवळ २० मिनिट असेल. या ग्रहणाचा सुतक काळ सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल.
२०२६ मधील दुसरे चंद्रग्रहण
२०२६ मधील दुसरे चंद्रग्रहण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच शुक्रवार,
२८ ऑगस्ट २०२६ रोजी असेल. परंतु, हे ग्रहण भारतात न दिसता, ते जगातील इतर देशांमध्ये दिसेल. भारतात दिसत नसल्याने या ग्रहणाचा सूतक काळ भारतात लागू होणार नाही.
