Chandra Grahan Holi 2024:फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार, यंदा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी २४ मार्च २०२४ सकाळी ९.५७ वाजेपासून दुसऱ्या दिवशी २५ मार्च २०२४ ला दुपारी १२:३२ वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार होलिका दहन २४ मार्च २०२४ ला असणार आहे. यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त भद्रा नक्षत्र संपल्यावर असेल. तर २५ मार्च २०२४ रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होत असते. २५ मार्च २०२४ रोजी हे चंद्रग्रहण सकाळी १०:४१ वाजता सुरू होईल आणि सुमारे ३:०१ वाजता समाप्त होईल. या होळीच्या शुभ पर्वावर अतिशय शुभ योगाची निर्मिती होणार असून काही राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी शुभ परिणाम देणारी ठरु शकते. व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. या राशीच्या लोकांची रखडलेली व प्रलंबित सर्व कामं पुन्हा सुरू होऊ शकतो. याचबरोबर तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळू शकेल.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी फायदेशीर ठरु शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.

(हे ही वाचा : एप्रिल सुरु होताच ‘या’ ६ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? अनेक मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?)

सिंह राशी

यंदाची होळी सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या राशीचे लोकं प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग वापरून पाहू शकता.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी होळी वरदानच ठरु शकते. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे.  

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी आनंद घेऊन येणारी ठरु शकते. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळू शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आपल्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)