Chaturgrahi Yog in Meen Rashi: मीन राशीमध्ये शुक्र, बुध, शनि आणि राहु विराजमान आहे, जे एकत्र येऊन चतुर्ग्रही योग निर्माण करत आहे. हा योग वृषभ, मिथुन सह चार राशीच्या लोकांनाच्या करिअरमध्ये यश, पैसा, मान सन्मान आणि वैवाहिक सुख देईल. मीन राशीमध्ये चार ग्रहांचे दुर्लभ एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होईल जो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असेल. म्हणजेच १५ दिवसापर्यंत या चार राशींची मजा असेल. या दरम्यान त्यांना मोठ्या संधी मिळू शकतात. त्या चार राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मिथुन राशी (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगचा मोठा लाभ मिळू शकतो. विशेषत: व्यावसायिकांना याचा मोठा लाभ मिळू शकतो. नवीन संपर्क निर्माण होईल जे भविष्यात लाभ देणारे ठरू शकतात. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामकाजासाठी प्रवास करावा लागू शकतो. या लोकांचा समाजात मान सन्मान वाढणार. तसेच आर्थिक लाभ होईल. अप्रत्यक्ष या लोकांना अपार धनलाभ होऊ शकतो. या लोकांच्या सर्व अडचणी दूर होणार, आयुष्यात सकारात्मकता दिसून येईल. हे लोक स्वत:च्या मनाप्रमाणे जगतील.
धनु राशी (Sagittarius Zodiac)
धनु राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगचा लाभ दिसून येईल. यांना नशीबाची साथ मिळेल. अडकलेले कामे पूर्ण होतील. काही लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. आध्यात्मिक आवड निर्माण होईल आणि यांच्या घरामध्ये आनंद दिसून येईल. कौटुंबिक सलोखा वाढेल. या लोकांचे नातेसंबंध सुधारतील. या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. या लोकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी दिसून येईल. प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल.
कुंभ राशी (Scorpio Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग आर्थिक स्वरुपात लाभदायक ठरणार आहे. नोकरीमध्ये या लोकांना प्रमोशन मिळू शकते. पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील. सगळीकडे या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारासह या लोकांच्या प्रेमसंबंध आणखी दृढ होतील. कष्टाचे फळ मिळू शकते. वरिष्ठांच्या सहकार्याने आयुष्यात प्रगती होईल. या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)