- मेष : महत्वाची पत्रं, फोन येतील. परप्रांतातील भावंडांशी संपर्क साधाल. धडाडीने महत्वाचे निर्णय घ्याल. दिवसाची सुरुवात अतिशय आनंदात होईल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
- वृषभ : संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. आज आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे लिखाण होईल. आपण घेतलेल्या निर्णयांची अमलबजावणी होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. कार्यक्षेत्रातील प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशी संस्थांशी संबंध येतील.
- मिथुन : आपण पूर्वी केलेल्या कामाची पोच मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्याल. घरी पाहुणे येण्याची शक्यता. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणाऱ्या घटना घडतील. कार्यकौशल्याची प्रशंसा होईल.
- कर्क : आपले मनोबल कमजोर होण्याची शक्यता. महत्वाचे पत्रव्यवहार होतील. आर्थिक उलाढाली टाळाव्यात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुसंधी लाभतील. महत्वाचे निर्णय घ्याल.
- सिंह : आजचा दिवस नवीन व्यवसायाच्या शुभारंभासाठी अनुकूल. स्थिर मनाने महत्वाचे निर्णय घ्या. विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक प्रगतीचा दिवस. उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांपासून त्रास होण्याची शक्यता. विरोधकांचा त्रास जाणवेल.
- कन्या : नोकरीत बढती-बलदीचे योग संभवतात. कुटुंबातील व्यक्तिंसाठी वस्तूंची खरेदी करावी
लागेल. अंदाज अचूक ठरतील. कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता. - तूळ : भाग्यकारक घटना घडतील. पूर्वी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान मिळेल. कामानिमित्त प्रवास करावे लागतील. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.
- वृश्चिक : मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. अचानक धनलाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल.
मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. काही कामे अपुरी राहतील. सट्टे अगर इतर धाडसाचे व्यापार करु नयेत. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. - धनु : कामानिमित्त वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. पूर्वी मागितलेली एखादी सवलत आज मान्य
होईल. आपले निर्णय ठाम ठेवा. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. मित्र परिवाराची भेट होईल. - मकर : आपली कामं पूर्ण होताना विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. विरोधकांवर मात कराल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्या. दुपारनंतर एखादी चांगली बातमी कळेल व घरातील वातावरण आनंददायी होईल.
- कुंभ : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस. नोकरीत उत्कर्षकारक घटना घडतील. लॉटरीचे तिकिट घेऊन पहा. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल.
- मीन : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबासाठी काहीतरी विशेष खरेदी कराल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल.
— ज्योतिषी विद्याधर करंदीकर
