- मेष:-
गैरसमज दूर सारावेत. फार विचार करत राहू नये. कलेला योग्य वेळ द्यावा. गुरुकृपेचा लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. - वृषभ:-
जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही लाभ अचानक दिसतील. योग्य संधीची वाट पाहावी. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन मित्र जोडले जातील. - मिथुन:-
कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नयेत. चिकाटी सोडू नका. तुमचे संपर्क वाढतील. चारचौघात उठबस करावी लागेल. संपर्कातील लोकांकडून कौतुक केले जाईल. - कर्क:-
जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. प्रकृतीच्या तक्रार दूर होईल. मानसिक शांततेला महत्व द्यावे. कामातून चांगली प्राप्ती संभवते. - सिंह:-
मुलांच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तुमच्या कडील माहितीचा सदुपयोग करता येईल. पत्नीची बाजू जाणून घ्यावी. प्रवासात सतर्कता ठेवावी. अतिकाळजी करत राहू नका. - कन्या:-
हातातील कामाकडे लक्ष द्यावे. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कसलीही चालढकल करू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्या. मनातील निराशा दूर सारावी. - तूळ:-
कामातून मिळणार फायदा लक्षात घ्यावा. खर्चाचा पुनर्विचार करावा. तुमच्यातील धैर्य वाढेल. धाडसाने नवीन कामात हात घालावा. ताळमेळ साधण्यात यश येईल. - वृश्चिक:-
आर्थिक गणित कोलमडू देऊ नका. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. कामातील उत्साह वाढले. आततायीपणाने निर्णय घेणे टाळावे. नातेवाईकांशी क्षुल्लक गोष्टींवरून मतभेद संभवतात. - धनु:-
मानसिक चिंता दूर करण्याचा प्रयत्न करावा. थकवा जाणवेल. स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यावे. सामाजिक जाणिव ठेवाल. अडथळा बाजूला करता येईल. - मकर:-
प्रत्येक गोष्टीत आनंद शोधावा. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचायला मिळेल. महिला आपली हौस पूर्ण करतील. सर्वांशी गोड बोलाल. - कुंभ:-
सर्व गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. मनातील विचित्र कल्पना बाजूला साराव्यात. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आवडीने पदार्थांची चव चाखाल. घरगुती कामात दिवस जाईल. - मीन:-
तुमच्या मनमिळाऊ व्यक्तिमत्वाची छाप पडेल. आनंदीवृत्तीने वागाल. मित्रांच्या ओळखीने कामे होतील. व्यावसायिक लाभ चांगला होईल. वाहन विषयक प्रश्न मार्गी लागतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०३ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 03-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 03 january 2020 aau