- मेष:-
कौटुंबिक सौख्याचा दिवस. घरातील वातावरण आनंदी राहील. चांगले वाहन सौख्य मिळेल. कामाचा वेग वाढेल. दिवस मजेत जाईल. - वृषभ:-
जवळचा प्रवास मजेत होईल. भावंडांचा प्रेमळ सहवास मिळेल. चांगले पुस्तक वाचनात येईल. जवळचे मित्र भेटतील. मनाची संवेदनशीलता दाखवाल. - मिथुन:-
गुंतवणुकीचा पर्याय शोधाल. आवडते पदार्थ खायला मिळतील. सर्वांशी प्रेमळपणे बोलाल. कौटुंबिक खर्चाचा विचार कराल. घरात शांतता ठेवावी. - कर्क:-
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. प्रेमसंबंधात अरेरावी करू नये. मुलांची काळजी घ्यावी. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. - सिंह:-
हातातील अधिकार वापरावेत. कामातील ऊर्जा वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. मैत्रीतील वाद वाढू देऊ नका. हित शत्रूंकडे लक्ष देऊ नका. - कन्या:-
बोलतांना सावधगिरी बाळगावी. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. कौटुंबिक खर्च वाढेल. वादविवादात भाग घेऊ नका. चोरांपासून सावध राहावे. - तूळ:-
पित्त विकाराचा त्रास जाणवेल. उगाचच निराश होण्याचे कारण नाही. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. चैनीत दिवस घालवाल. मनाची चंचलता जाणवेल. - वृश्चिक:-
मानापमानात अडकू नका. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. पायाचे त्रास जाणवतील. आरोग्याची काळजी घ्यावी. - धनु:-
झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक कार्यक्रम होतील. काही गोष्टी क्षणिक असतील. उगाचच चिंता लागून राहील. सकारात्मकतेने विचार करावा. - मकर:-
कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. कौटुंबिक सौख्य वाढेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. - कुंभ:-
मोठ्या लोकांची संगत लाभेल. सरकारी कामात वेळ जाईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. बढतीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. कौटुंबिक समाधान लाभेल. - मीन:-
अतिअपेक्षा करू नका. मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. जवळचे मित्र भेटतील. सखोल चिंतन कराल. सांस्कृतिक गोष्टीत लक्ष घालाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 18-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 18 november 2019 aau