- मेष:-
मानसिक स्थैर्य जपावे. फसवणुकीपासून सावध राहावे. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. वेळेचे भान राखावे. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. - वृषभ:-
रेस, जुगार यांपासून दूर राहावे. नवीन मित्र जोडाल. कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल. कौटुंबिक समाधान लाभेल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. - मिथुन:-
मानसिक चांचल्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नसते विचार करू नका. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. धैर्य वाढीस लागेल. हातापायाच्या इजांकडे दुर्लक्ष करू नये. - कर्क:-
उधळपट्टी करू नये. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. सारासार विचार करूनच बोलावे. स्वभावात लहरीपणा जाणवेल. आपण श्रम करण्यात मागे पडणार नाही. - सिंह:-
भाजणे, कापणे यांसारचे त्रास होवू शकतात. जोमाने कामे कराल. हुकुमत गाजविण्याचा प्रयत्न कराल. कामात उताविळपणा करू नये. चटकन रागवू नये. - कन्या:-
सामुदाईक वादात अडकू नका. उष्णतेचे विकार जाणवतील. प्रवासात वाहन चालवितांना काळजी घ्यावी. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अघल-पघल बोलणे टाळावे. - तूळ:-
अति उत्साह दाखवू नका. झोपेची तक्रार जाणवेल. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. सतत काहीनाकाही काम करत राहाल. मुलांच्या दुखण्याकडे लक्ष द्यावे. - वृश्चिक:-
बदलला सकारात्मकतेने पहावे. अविचाराने वागू नका. सतत वरचा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न कराल. परिस्थितीवर संघर्षाने मात कराल. तुमच्यातील झुंझारपणा दिसून येईल. - धनु:-
जुनाट पद्धतीने विचार कराल. प्रतिकुलतेतून योग्य मार्ग काढाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. जोडीदाराशी गप्पा मारण्यात रमून जाल. नवीन लोकांशी ओळख वाढेल. - मकर:-
कामातून समाधान शोधाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील आशा-निराशा यांचे द्वंद्व चालू राहील. - कुंभ:-
आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. काटकसर करण्यावर भर द्याल. एकांगी विचार करू नयेत. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. शांततेचे धोरण स्वीकारावे. - मीन:-
घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालावे. जोडीदाराची प्रगती होईल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो. पुराणमतवादी विचार मांडाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 23-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 23 september 2019 aau