- मेष:-
तुमची कार्यशक्ती वाढेल. स्वभावात लहरिपणा येईल. इतर कोणाचे बाह्य दडपण सहन होणार नाही. स्वतः च्या हिमतीवर विश्वास ठेवाल. संशोधनाकडे कल राहील. - वृषभ:-
जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. एकमेकांत मतभेदाला थारा देऊ नका. भागीदारीत सलोख्याचे संबंध ठेवा. योग्य संधीची वाट पाहावी. सामाजिक संबंध दृढ होतील. - मिथुन:-
मानसिक चांचल्य जाणवेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात येण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार बळावू शकतात. जोडीदाराची काळजी घ्यावी. - कर्क:-
धडाडी दाखवण्याची संधी येईल. चांगली प्रतिभा लाभेल. कलेला चांगले पोषक वातावरण मिळेल. मुलांच्या कारवाया वाढू शकतात. स्वतंत्र विचार दर्शवाल. - सिंह:-
प्रवासाचा योग येईल. नवनवीन विचार मांडाल. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. तुमची बुद्धिमत्ता दिसून येईल. कामात कल्पकतेची जोड घ्याल. - कन्या:-
बाहेरील पदार्थ खाण्याचे टाळावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हातातील अधिकाराचा योग्य वापर करावा. घराची स्वच्छता काढाल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. - तूळ:-
फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळा. द्वेषाला मनातून काढून टाकावे. एखादेवेळी अपयश पदरी पडू शकते. खर्च आटोक्यात ठेवावा. - वृश्चिक:-
किरकोळ जखम होऊ शकते. कोणाशीही उगाच शत्रुत्व घेऊ नका. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडचणीतून मार्ग निघेल. - धनु:-
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. अकारण चिंता मनात डोकावू शकते. पायाच्या स्नायूंचा त्रास जाणवू शकतो. वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. - मकर:-
कौटुंबिक सुखात वाढ होईल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. तुमचा मान वाढेल. व्यावसायिक बदल योग्य ठरतील. तुमची कार्यक्षमता वाढेल. - कुंभ:-
प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. कष्ट वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टीत लक्ष घालू नका. वादातून शत्रुत्व पत्करू नका. अधिकाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. - मीन:-
प्रवासात सावधानता बाळगावी. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. घरातील ज्येष्ठांचा योग्य तो मान राखावा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, ३० डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 30-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 30 december 2019 aau