- मेष:-
कामाची धांदल उडेल. औद्योगिक वातावरण चांगले लाभेल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. तुमच्या अंगाचे कलागुण समोर येतील. कामे अपेक्षेप्रमाणे पार पडतील. - वृषभ:-
नवीन विचारांची कास धराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. अचानक धनलाभ संभवतात. - मिथुन:-
अचानक धनलाभ संभवतात. शेअर्सच्या कामातून फायदा होऊ शकतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काची कामे निघतील. कामे कमी श्रमात पार पडतील. - कर्क:-
समजूतदारपणे वागणे ठेवाल. जोडीदाराचा कर्तव्यदक्षपणा दिसून येईल. पत्नीचा शांत स्वभाव दिसून येईल. एकमेकांचे मत विचारात घ्याल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. - सिंह:-
आळशीपणा करू नये. योग्य वाव मिळण्याची वाट पाहावी लागेल. नातेवाईकांचे उत्तम सहकार्य मिळेल. ऐशारामाच्या वस्तू खरेदी कराल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. - कन्या:-
गप्पागोष्टींमध्ये वेळ वाया घालवाल. प्रेमात प्रगती कराल. आत्मिक समाधान मिळेल. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल. रेस, जुगार यांतून लाभ होईल. - तूळ:-
घरात टापटीप ठेवाल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. उत्तम प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - वृश्चिक:-
विविध विषयांची आवड दर्शवाल. दुसऱ्यांचे मनापासून कौतुक कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. - धनु:-
बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. समाजकार्यातून लाभ संभवतो. दागदागिने खरेदी कराल. आर्थिक स्थैर्याचा विचार कराल. सामाजिक बांधिलकी जपाल. - मकर:-
इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा छाप पडेल. महिला नटण्याची हौस पुरवतील. दिवस आनंदात घालवाल. आनंदी दृष्टिकोन ठेवाल. नवीन विचार आमलात आणाल. - कुंभ:-
मानसिक चिंता बाजूला साराव्यात. उघडपणे बोलणे टाळावे. कामानिमित्त दूर गावी जावे लागेल. लहान मुलांच्यात रममाण व्हाल. मनात नसतांना सुध्दा काही गोष्टी कराव्या लागतील. - मीन:-
खूप जुनी इच्छा पूर्ण होईल. अधिकाऱ्यांच्या ओळखीतून काम पूर्ण करावे. कामाची सखोलता समजून घ्यावी. आंतरिक शक्तीने कामे कराल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शनिवार, २८ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by अमित उजागरे

First published on: 28-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 28 december 2019 aau