• मेष:-
    कामाची धांदल उडेल. औद्योगिक वातावरण चांगले लाभेल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. तुमच्या अंगाचे कलागुण समोर येतील. कामे अपेक्षेप्रमाणे पार पडतील.
  • वृषभ:-
    नवीन विचारांची कास धराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. अचानक धनलाभ संभवतात.
  • मिथुन:-
    अचानक धनलाभ संभवतात. शेअर्सच्या कामातून फायदा होऊ शकतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काची कामे निघतील. कामे कमी श्रमात पार पडतील.
  • कर्क:-
    समजूतदारपणे वागणे ठेवाल. जोडीदाराचा कर्तव्यदक्षपणा दिसून येईल. पत्नीचा शांत स्वभाव दिसून येईल. एकमेकांचे मत विचारात घ्याल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल.
  • सिंह:-
    आळशीपणा करू नये. योग्य वाव मिळण्याची वाट पाहावी लागेल. नातेवाईकांचे उत्तम सहकार्य मिळेल. ऐशारामाच्या वस्तू खरेदी कराल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.
  • कन्या:-
    गप्पागोष्टींमध्ये वेळ वाया घालवाल. प्रेमात प्रगती कराल. आत्मिक समाधान मिळेल. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल. रेस, जुगार यांतून लाभ होईल.
  • तूळ:-
    घरात टापटीप ठेवाल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. उत्तम प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
  • वृश्चिक:-
    विविध विषयांची आवड दर्शवाल. दुसऱ्यांचे मनापासून कौतुक कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
  • धनु:-
    बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. समाजकार्यातून लाभ संभवतो. दागदागिने खरेदी कराल. आर्थिक स्थैर्याचा विचार कराल. सामाजिक बांधिलकी जपाल.
  • मकर:-
    इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा छाप पडेल. महिला नटण्याची हौस पुरवतील. दिवस आनंदात घालवाल. आनंदी दृष्टिकोन ठेवाल. नवीन विचार आमलात आणाल.
  • कुंभ:-
    मानसिक चिंता बाजूला साराव्यात. उघडपणे बोलणे टाळावे. कामानिमित्त दूर गावी जावे लागेल. लहान मुलांच्यात रममाण व्हाल. मनात नसतांना सुध्दा काही गोष्टी कराव्या लागतील.
  • मीन:-
    खूप जुनी इच्छा पूर्ण होईल. अधिकाऱ्यांच्या ओळखीतून काम पूर्ण करावे. कामाची सखोलता समजून घ्यावी. आंतरिक शक्तीने कामे कराल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर