- मेष:-
तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. सर्वांशी आदराने वागाल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल. मनात नवीन महत्वकांक्षा जागृत होईल. - वृषभ:-
दिवस आनंदात जाईल. तुमचा नावलौकिक होईल. कामाचे समाधान लाभेल. परमार्थाचे महत्व जाणाल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. - मिथुन:-
मानसिक चंचलता जाणवेल. काही ठिकाणी ठामपणा दाखवावा लागेल. अनेक कामातून गोंधळ उडवून घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मधून धनलाभ संभवतो. - कर्क:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा प्रेमळपणा पुन्हा एकदा दिसून येईल. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास मजेत पार पडेल. सर्वांशी समजूतदारपणे वागाल. - सिंह:-
तिखट पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. काही निर्णय धाडसाने घ्याल. प्रकृतीची चिंता दूर होईल. खर्च आटोक्यात ठेवावा. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. - कन्या:-
उष्णतेचा त्रास जाणवेल. अडचणींवर मात करावी. गुंतवणूक करतांना सतर्कता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. डोळ्यांची काळजी घ्यावी. - तूळ:-
कामाचा व्याप वाढू शकतो. काही गोष्टींमध्ये अडकून पडल्या सारखे वाटू शकते. मानापमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. - वृश्चिक:-
झोपेची तक्रार जाणवेल. चांगला धनलाभ संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. हातातील कामात यश येईल. चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. - धनु:-
अनाठायी खर्च वाढू शकतो. मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याचा मान ठेवावा. प्रवासात काळजी घ्यावी. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. आर्थिक व्यवहारात सावध राहावे. - मकर:-
दिवस मनासारखा व्यतीत कराल. जवळचे मित्र भेटतील. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. व्यावसायिक लाभ चांगला होईल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. - कुंभ:-
अपचनाचा त्रास जाणवू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील गैरसमज काढून टाकावेत. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. - मीन:-
पत्नीशी मतभेद संभवतात. भागीदारीत सलोखा जपावा. चुकीच्या संगतीत अडकू नका. वरिष्ठांची मर्जी राखावी. मनातील अकारण भीती काढून टाकावी.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, ०३ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 03-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 03 november 2019 aau