- मेष:-
जवळचा प्रवास घडेल. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आवडत्या गोष्टी करण्यावर भर दयावा. अतिविचारात गुंतून पडू नका. वाचनाने आनंद मिळेल. - वृषभ:-
आवडी-निवडी बाबत सतर्क राहाल. घरातील कामात दिवस जाईल. नातेवाईकांची वर्दळ वाढेल. सर्वांचे हौसेने कराल. गप्पागोष्टींचा आनंद घ्याल. - मिथुन:-
मनाची व्यग्रता दूर सारावी. चौकसपणे विचार करावा. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. दिवस हसून-खेळून घालवाल. प्रगल्भ विचार व्यक्त कराल. - कर्क:-
कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील शांतता जपावी. तुमच्यातील संयम वाढवावा लागेल. अति घाई करू नका. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. - सिंह:-
मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन ओळखी होतील. कामाचा आनंद मिळेल. व्यापारीवर्ग खुश असेल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. - कन्या:-
बोलताना शब्दांना आवर घालावी. फार चिडचिड करू नये. तिखट व तामसी पदार्थ खाणे पसंद कराल. फसवणुकीपासून सावध राहावे. भडक शब्दांत मत मांडू नका. - तूळ:-
इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. धार्मिक कामात हातभार लावाल. कामाची दगदग राहील. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. - वृश्चिक:-
कामाचा व्याप वाढेल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्य वाढेल. कामातून चांगला धनलाभ होईल. - धनु:-
प्रवासात सतर्कता ठेवावी. नातेवाईकांचे प्रश्न भेडसावतील. सर्वांशी सलोख्याने वागावे. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. आवश्यक तेथे बदल करावेत. - मकर:-
हाताखालील लोकांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मनापासून कामाचा आनंद घ्याल. जोडीदाराविषयी गैरसमज करून घेऊ नका. व्यसनांपासून दूर राहावे. इतरांच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नका. - कुंभ:-
दिवस हसतखेळत घालवाल. आवडते छंद जोपासाल. पैज जिंकण्याचा मनसुबा ठेवाल. करमणुकीकडे अधिक लक्ष राहील. मोठ्या लोकांची गाठ पडेल. - मीन:-
दिवसभर व्यग्र राहाल. वादात अडकू नका. मनातील चुकीचे समज बाजूला सारवेत. बागेत काम करण्यात वेळ घालवाल. सामाजिक वजन लक्षात घ्यावे.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, १७ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 17-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 17 november 2019 aau