- मेष:-
भागिदारीतून चांगला फायदा होईल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. ओळखीचा चांगला लाभ होईल. आनंदी दृष्टिकोन ठेवाल. - वृषभ:-
उगाच चिडचिड होईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वासाने कामे करावीत. कफाचा त्रास जाणवेल. ठामपणा ठेवावा लागेल. - मिथुन:-
कलेचा मनापासून आनंद घ्याल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. मुलांशी सुसंवाद साधावा. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. - कर्क:-
सहकुटुंब सहलीचे आयोजन कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामाला अपेक्षित गती येईल. मुले खेळात प्राविण्य मिळवतील. तुमची धिटाई वाढेल. - सिंह:-
जवळचा प्रवास मजेत करता येईल. जमिनीच्या व्यवहारात लाभ संभवतो. मुलांची प्रगती दिसून येईल. घरातील किरकोळ कुरबुरी दूर कराव्यात. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. - कन्या:-
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अंगीभूत कला जोपासता येईल. कामातील उत्साह वाढेल. अधिक उर्जेने कामाला लागाल. तुमचा मान वाढेल. - तूळ:-
आवडत्या कामात मन रमवाल. दिवस स्वछंदतेत जाईल. खर्च वाढू शकतो. ऐषारामाच्या कल्पनेत रमून जाल. व्यावसायिक लाभ उत्तम राहील. - वृश्चिक:-
अडचणीतून मार्ग काढता येईल. स्वत:च्या मतावर ठाम राहाल. घरात मंगल कार्य घडेल. हातातील अधिकार वापरता येतील. मित्र मंडळ जमवाल. - धनू:-
शांततेने मार्ग काढाल. कौटुंबिक खर्च वाढेल. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळाल. त्रासातून मार्ग निघेल. जबाबदारीची जाणीव ठेवा. - मकर:-
कामाचा व्याप वाढू शकतो. काही वेळ स्वत:साठी द्यावा. कामाचा उरक वाढवाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. रेंगाळलेली घरगुती कामे पूर्ण होतील. - कुंभ:-
कलाकुसरीकडे ओढ वाढेल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. मानापमान मनावर घेऊ नका. योग्य वेळेची वाट पहावी. सामाजिक कार्यात हातभार लावाल. - मीन:-
रेस सट्टा यांतून फायदा संभवतो. कामाचे योग्य मूल्यमापन करावे. थोरांचे सहकार्य लाभेल. मोठ्या लोकांत उठ-बस वाढेल. वरिष्ठांना खूष करावे.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, १९ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 19-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 19 january 2020 aau