मेष : ॐ ईश्वराय नमः आजचा शुभ रंग गडद निळा आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी. वृषभ : ॐ गणराजाय नमः आजचा शुभ रंग पिवळा आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबीक कलह कमी होतील, सौख्य लाभेल. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल. मिथुन : ॐ अंबिकायै नमः आजचा शुभ रंग सोनेरी आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायीकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावी. कर्क : ॐ हिरण्यकेशाय नमः आजचा शुभ रंग लाल आहे. मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील. सिंह : ॐ हराय नमः आजचा शुभ रंग गुलाबी आहे. कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांना आजचे ग्रहमान अनुकूल आहेत. कन्या : ॐ आनंदाय नमः आजचा शुभ रंग हिरवा आहे. व्यावसायीक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग आहेत. तुळ : ॐ आद्यायै नमः आजचा शुभ रंग फिक्कट हिरवा आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. वृश्चिक : ॐ चरंजिवाय नमः आजचा शुभ रंग नारंगी आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. धनु : ॐ पार्थध्वजाय नमः आजचा शुभ रंग पांढरा आहे. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. मकर : ॐ पद्माक्षाय नमः आजचा शुभ रंग नारंगी आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील. कुंभ : ॐ नारायण्यै नमः आजचा शुभ रंग निळा आहे. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल. मीन : ॐ जिष्णवै नमः आजचा शुभ रंग आकाशी आहे. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नविन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे. – डॉ. योगेश मुळे Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu