• मेष:-
    भावंडांचे प्रश्न उपस्थित होतील. स्मरणशक्तीवर जोर द्यावा लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. वैचारिक मतभेद संभवतात. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे.
  • वृषभ:-
    क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड होईल. संयम व शांतता पाळावी. जोडीदाराचा सुशिक्षितपणा दिसून येईल. तुमचे संपर्क वाढतील. भागीदारीत लाभ संभवतो.
  • मिथुन:-
    इतरांचा सल्ला घेताना विचार करावा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. समोरच्याच्या मताचा आदर करावा. इतरांचा विश्वास संपादन करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
  • कर्क:-
    घरातील वातावरण समाधानकारक असेल. कामात प्रगती करता येईल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. वाताचा त्रास जाणवेल.
  • सिंह:-
    जवळचा प्रवास कराल. कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. भावंडांशी मतभेद संभवतात. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
  • कन्या:-
    गोड बोलून कामे साधून घ्यावीत. खर्चाचा विचार करावा लागेल. बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. जवळचे मित्र भेटतील. कौटुंबिक खर्च वाढेल.
  • तूळ:-
    घरात टापटीप ठेवाल. आवक-जावक यांचा मेळ घालावा लागेल. आपले मत परखडपणे मांडाल. कामाचा उत्साह वाढेल. हट्टीपणा बाजूला सारावा लागेल.
  • वृश्चिक:-
    सारासार विचार करून कृती करावी. अघळपघळ बोलू नका. संभाषणाची आवड पूर्ण कराल. मानसिक चंचलता जाणवेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
  • धनु:-
    कामाची दगदग वाढेल. क्षुल्लक कारणांनी काही कामे अडकून पडू शकतात. अडथळ्यातून मार्ग निघेल. शांत व संयमी विचार कराल. कलेकडे ओढ वाढेल.
  • मकर:-
    सर्वांशी प्रेमळपणे वागाल. आवडत्या गोष्टी करण्यावर लक्ष द्याल. विचारात स्वच्छंदीपणा येईल. दिवस इच्छेनुसार व्यतीत कराल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल.
  • कुंभ:-
    अधिकारी व्यक्तींची गाठ घ्याल. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. ओळखीच्या व्यक्ती भेटतील. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. विशाल दृष्टिकोन ठेवाल.
  • मीन:-
    सरकारी कामात अडकून पडाल. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. स्त्रियांच्या मदतीने कामे पार पडतील. कामाची योग्य पोचपावती मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर