- मेष:-
स्वभावात काहीसा मानीपणा येईल. महत्वकांक्षा वाढीस लागेल. दर्जा टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. हातातील अधिकारात वाढ होईल. प्रयत्नात कमी पडू नका. - वृषभ:-
काही गोष्टी वेळेअभावी मागे राहतील. अवास्तव अपेक्षा बाळगू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. कष्ट घेण्यात कमी पडू नका. इच्छा पूर्ण होण्यास थोडा वेळ द्यावा. - मिथुन:-
जोडीदाराचा मानीपणा लक्षात येईल. उच्च राहणीची आवड दर्शवाल. ठाम निर्णय घेण्यात कमी पडू नका. पत्नीची प्राप्ती वाढेल. आधुनिक विचारांची कास धरावी. - कर्क:-
गैरसमजुतीतून भांडणे वाढू शकतात. परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास जाणवतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मामाची मदत घेता येईल. - सिंह:-
वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. आर्थिक गोष्टींवरून वाद वाढू शकतात. आध्यात्मिक प्रगती करता येईल. तर्कनिष्ठ बुद्धिमत्ता वापराल. स्त्री दाक्षिण्य दाखवाल. - कन्या:-
उत्तम वाहन सौख्य लाभेल. परिस्थितीशी जुळवून घ्याल. सुखशांती व उत्तम गृहसौख्य लाभेल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. बौद्धिक हातवादीपणा दाखवू नका. - तूळ:-
उतावीळपणा करू नका. खर्च करतांना मागचा-पुढचा विचार करावा. डोळ्यांचे त्रास जाणवतील. श्रम करण्यात कमी पडू नका. नको तिथे उदारपणा दाखवू नये. - वृश्चिक:-
मेहनतीत कमी पडू नका. तुमचा रुबाब दिसून येईल. उतावीळपणा करू नका. ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. आपलेच म्हणणे खरे कराल. - धनु:-
आवडीचे पदार्थ खायला मिळतील. उत्कृष्ट वक्तृत्व दाखवाल. लाघवी व गोड बोलाल. बौद्धिक हातवादीपणे वागू नका. गायन कला जोपासता येईल. - मकर:-
सतत खटपट करत राहाल. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे. प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्याल. चांगली मैत्री लाभेल. - कुंभ:-
मानसिक चिंता दूर सारावी. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मनाचे स्थान मिळेल. चांगला आर्थिक लाभ होईल. - मीन:-
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आवडत्या वस्तू खरेदी करता येतील. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने कृती करावी. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडाल. हातात उच्च अधिकार येतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, २९ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 28-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 29 december 2019 aau