मेष

दत्त मंदिरामध्ये साखर, फुटाणे, गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवणे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्लामसलत करावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
ओम राहवे नम: आणि श्री गुरूदेव दत्त हे जप करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
दत्त मंदिरामत आज तांदूळ अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावीत. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – नारंगी

कर्क
ओम द्रा दत्तात्रयाय नम: या मंत्राची एक माळ जप करून दिवसाची सुरूवात करणे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. स्पर्धकावर मात करू शकाल.
आजचा रंग – हिरवा

सिंह
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पोपटी

कन्या
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – गुलाबी

वृश्चिक
आज ओम नम: शिवाय आणि गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – गडद निळा

धनु
दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्लामसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – निळा

मकर
गुरू चिंतनामध्ये आज दिवस घालवावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्रमंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम नमो नारायण या मंत्राचे नामस्मरण दिवसीार करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग- पांढरा

मीन
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu