- मेष:-
लहान प्रवास कराल. मानसिक दोलायमानता जाणवेल. आपला ठामपणा टिकवून ठेवा. गैरसमजाला मनातून दूर सारा. इच्छा जागृत ठेवावी. - वृषभ:-
आवडीच्याबाबत कसूर करू नका. चित्त एकाग्र ठेवावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांच्या मताचा आदर करावा. प्रक्रृतीची काळजी घ्यावी. - मिथुन:-
मनाची चंचलता जाणवेल. पोटाची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार जाणवतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. - कर्क:-
शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. नवीन संधीची वाट पाहावी. अपचनाचा त्रास जाणवेल. मुलांकडून विरोध होऊ शकतो. हातातील कामात यश येईल. - सिंह:-
उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. कौतुकास पात्र व्हाल. वाहन विषयक प्रश्न सुटतील. एखादे नवीन वाहन खरेदीचा विचार करावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. - कन्या:-
उत्तम गृहसौख्य लाभेल. कामातून चांगली प्राप्ती होईल. नवीन मित्र जोडता येतील. अपेक्षांना आवर घालावी. अधिकाराची जाणीव ठेवा. - तूळ:-
शब्द जपून वापरावेत. खर्चाचा मेळ घालावा लागेल. कोणाविषयी मनात द्वेष बाळगू नका. वादाचे मुद्दे बाजूला सारा. फसवणुकीपासून सावध राहावे. - वृश्चिक:-
किरकोळ जखमांकडे लक्ष द्या. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पेलाल. कष्टाशिवाय पर्याय नाही. समाधानकारक आर्थिक लाभ होईल. - धनु:-
कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढावा. फार काळजी करत बसू नका. प्रवासात काळजी घ्यावी. घरात काही बदल करून पहावेत. खर्चाचा ताळमेळ घालावा. - मकर:-
प्रवासात खर्च वाढेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कामानिमित्त दूर गावी जावे लागेल. खंबीरपणे विचार करावा. कागदपत्रे जपून ठेवावीत. - कुंभ:-
दिवस प्रसन्नतेचा राहील. सर्वांशी आनंदाने वागाल. नवीन मित्र जोडावेत. प्रयत्नात कसूर करू नका. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना फायदा होईल. - मीन:-
घरातील थोरांचा विरोध लक्षात घ्यावा. प्रवास जपून करावा. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्य वाढेल. कमिशनमधून लाभ होईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०९ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 09-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 09 january 2020 aau