मेष

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. ओम द्रां दत्तात्रयाय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करणे.
आजचा रंग- नारंगी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. गणपती पूजन आणि अथर्वशीर्षाचे पठण करावेत.
आजचा रंग – पोपटी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. ओम श्री दत्तात्रयाय नमः जप करावा.
आजचा रंग – हिरवा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. दत्त मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करणे. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. ओम हरये नमः या मंत्राचा जप करणे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. ओम शांभवे नमः जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ओम द्रां द्री दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ओम द्रां द्री दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. आज पांढऱ्या वस्तूंचे दान करणे.
आजचा रंग – राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करू शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम. दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घेणे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 23 march
First published on: 23-03-2017 at 01:30 IST