मेष

दत्त महाराजांची उपासना करावी. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपााचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –निळा

वृषभ

गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवार्इकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –आकाशी

कर्क

ओम गं गणपतये नम: या मंत्राचा जप करावा. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पिवळा

सिंह

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग -निळा

कन्या

गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होर्इल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होर्इल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –गुलाबी

तुळ

गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू अर्पण करावे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगार्इ नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग -निळा

वृश्चिक

दत्त महाराज आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावी. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होर्इल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. अधिकार संपन्नता येर्इल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होर्इल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –निळा

मकर

गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होर्इल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग –तपकिरी

कुंभ

गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकॄतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- पांढरा

मीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जपा करावा. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu