- मेष:-
कामात मन रमवावे. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. चारचौघात जपून बोलावे. भागीदाराशी समजुतीने वागावे. - वृषभ:-
प्रवासाचा आनंद घ्याल. हातातील कलेचा सदुपयोग करावा. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. आवडते ग्रंथ वाचायला मिळतील. सर्वांशी प्रेमळ संवाद साधाल. - मिथुन:-
शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडाल. हसत-खेळत कामे कराल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रेमळपणे सर्वांचे मन जिंकून घ्याल. - कर्क:-
कौटुंबिक विसंवाद दूर करावेत. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराची मनधरणी करावी. प्रेम संबंध जपावेत. - सिंह:-
मैत्रीतील दुरावा दूर करावा. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. वादात फार लक्ष घालू नये. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. चुकीचे विचार बाजूला सारावेत. - कन्या:-
आरोग्यात सुधारणा होईल. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्यातील धाडस वाढेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्याने बोलणे टाळावे. - तूळ:-
चुकीच्या संगतीत अडकू नका. अनाठायी खर्च वाढेल. योग्य तारतम्यता बाळगावी. अघळपघळ बोलू नका. कौटुंबिक खर्चावर लक्ष ठेवा. - वृश्चिक:-
कामाचा व्याप वाढेल. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे. सामाजिक जाणिव जागृत ठेवावी. कागदपत्रे जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. - धनु:-
घरातील कार्यक्रमात सहभागी नोंदवाल. क्षणिक गोष्टींनी नाराज होऊ नका. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन मित्र मिळतील. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. - मकर:-
काही कामे जास्त श्रम करायला लावतील. बदलांना सकारात्मकतेने पहा. कमिशनच्या कामात लाभ संभवतो. आर्थिक चिंता मिटेल. मुलांच्या आनंदात रमून जाल. - कुंभ:-
प्रवासात सतर्कता बाळगावी. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. मनातील इच्छा पूर्ण होतील. कलेला प्रसिद्धी मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. - मीन:-
लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. औषधोपचार वेळेवर घ्यावेत. पित्तामुळे चिडचिड वाढेल. करमणुकीचे खेळ खेळाल. रेस, जुगार यांमध्ये फायदा संभवतो.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १९ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 19-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 19 november 2019 aau