- मेष:-
कौटुंबिक जबादारी वाढेल. काही क्षुल्लक समस्या सोडवाल. भावंडांच्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. अतिविचार करू नका. कफ विकाराचा त्रास जाणवेल. - वृषभ:-
व्यावहारिक कुशलता दाखवाल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. स्वाभाविक दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होतील. - मिथुन:-
खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचा विश्वास संपादन करावा. नसत्या भांडणात पडू नका. लबाड माणसांपासून दूर राहावे. चुकीच्या विचारांना बाजूला सारावे. - कर्क:-
घरगुती कलह सामंजस्याने सोडवावेत. जमिनीची कामे निघतील. बौद्धिक गोष्टींनी लक्ष वेधून घ्याल. मुलांचे प्रश्न सोडवाल. खरेपणाची कास धरावी. - सिंह:-
संभाषणाची आवड पूर्ण होईल. घरात नातेवाईक गोळा होतील. नवीन मित्र जोडाल. चांगले गृहसौख्य लाभेल. तुमचा प्रेमळपणा दिसून येईल. - कन्या:-
तर्कशुद्ध विचार करावा. आकलन शक्तीचा योग्य वापर कराल. भावंडांचे सौख्य लाभेल. नवीन माहिती गोळा कराल. आवडते पुस्तक वाचाल. - तूळ:-
आर्थिक आवक वाढविण्यासाठी नवीन पर्याय शोधाल. पित्तविकार बळावू शकतात. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. कमिशन मधून फायदा शोधाल. - वृश्चिक:-
अभ्यासूवृत्तीने वागणे ठेवाल. सर्व गोष्टीत तत्परता दाखवाल. स्मरणशक्तीचा योग्य वेळी वापर करता येईल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्याल. - धनु:-
मानसिक शांतता जपावी. काही कामात अडथळा येऊ शकतो. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. गायन कला जोपासावी. - मकर:-
खर्च वाढू शकतो. नैराश्य बाजूला सारावे. उगाचच चिंता करत बसण्याचे कारण नाही. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. लहानांशी मैत्री कराल. - कुंभ:-
व्यावसायिक वाढ करता येईल. आरोग्यात सुधारणा होईल. कामाची गडबड राहील. आदरणीय व्यक्तींची ओळख होईल. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. - मीन:-
अपवादांकडे दुर्लक्ष करावे. मनातील इच्छा पूर्ण होतील. मोठ्या लोकांची संगत लाभेल. हातातील कामात अपेक्षित यश येईल. सर्वांशी सहृदयतेने वागाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 24-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 24 december 2019 aau