- मेष:-
किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. हातातील कलेला वेळ द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. - वृषभ:-
उधारीचे व्यवहार नकोत. मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. अधिकार्यांच्या रोषाला बळी पडू नका. नवीन योजनांवर काम कराल. - मिथुन:-
करमणुकीत वेळ घालवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कष्टाला पर्याय नाही. समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल. - कर्क:-
महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. ध्यानधारणा करावी. दिवसभर आत्ममग्न राहाल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. सामाजिक हितसंबंध सुधारतील. - सिंह:-
शब्द देताना शहानिशा करा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंता करत बसू नका. जबाबदार्या वाढतील. आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल. - कन्या:-
पती पत्नीमध्ये गैरसमजाचे वारे वाहू शकतात. वेळेचे महत्त्व ध्यानात घ्या. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत. - तूळ:-
अडचणीवर खंबीरपणे मात कराल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. - वृश्चिक:-
मानसिक चंचलता जाणवेल. नसती काळजी करू नका. पराक्रमाला वाव आहे. हातातील कामात यश येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. - धनू:-
प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करा. मुलांचे वागणे स्वतंत्र वृत्तीचे वाटेल. अंगमेहनतीची कामे कराल. दैनंदिन कामात चाल ढकल करू नका. जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल. - मकर:-
उगाच रागराग करू नका. वाणीवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. कामाचा उरक वाढेल. - कुंभ:-
खेळीमेळीतून सत्कार्य कराल. कामाचा जोम वाढेल. समोरील संधि ओळखायला शिका. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. व्यवहारकुशलता दाखवावी. - मीन:-
अचानक धनलाभाचा योग. कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रकृतीत सुधारणा होईल. पथ्यपाणी चुकवू नये.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, मंगळवार, २५ ऑगस्ट २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 25-08-2020 at 00:33 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 25th august 2020 aau