- मेष:-
जुगारातून धनलाभ संभवतो. जोडीदाराशी मतभेद संभवतात. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. चारचौघात जपून बोलावे. चर्चेतून समस्या सोडवाव्यात. - वृषभ:-
घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. दिवस मजेत घालवाल. कामात स्थैर्य लाभेल. - मिथुन:-
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बौद्धिक मूल्यमापन कराल. आशावादी दृष्टिकोन ठेवाल. नवीन कपडे खरेदी कराल. आपले मत इतरांना व्यवस्थित पटवून द्याल. - कर्क:-
कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. सर्वांशी प्रेमाने वागाल. जवळच्या मित्रांच्या सहवासात रमाल. तुमच्या वागण्याचे कौतुक केले जाईल. - सिंह:-
गोष्टी मनाप्रमाणे करण्यावर भर द्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. सर्वांशी आदराने वागाल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल. दिवस काहीसा आळसात घालवाल. - कन्या:-
मानसिक शांतता जपावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. अतिविचार करू नयेत. सामाजिक कामात मदत कराल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. - तूळ:-
रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. अडचणीतून मार्ग काढाल. उगाचच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. उष्णतेचे त्रास जाणवतील. - वृश्चिक:-
पायाचे विकार त्रास देतील. अनावश्यक खर्च टाळावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्त्रीवर्गाशी जपून वागावे. नसत्या चिंता करत बसू नका. - धनु:-
मध्यस्थीच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक सौख्याचा अधिक विचार कराल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. स्थावरची कामे सुरळीत पार पडतील. - मकर:-
व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. बढतीची चिन्हे दिसू लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. आध्यात्मिक बळ वाढवाल. - कुंभ:-
अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. हातातील कामात यश येईल. ओळखीचा सदुपयोग करून घ्यावा. - मीन:-
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा मनापासून आनंद घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, बुधवार, २० नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 20-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 20 november 2019 aau