Aajche Rashi Bhavishya In Marathi 15 September 2025 : आज १५ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. आज व्यतिपात योग आणि मृगशीरा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९वाजेपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४८ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज सोमवारी कोणत्या राशीला कसा लाभ होणार जाणून घेऊयात…

१५ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi 15 September 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडाल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

उत्तम वाहन सौख्य लाभेल. शांत विचाराने कामे पूर्ण करा. मुलां प्रतीच्या जबाबदार्‍या पार पाडाल. कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

आपल्या निर्णयावर ठाम राहाल. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. राजकीय संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

कामाचा ताण वाढता राहील. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या शोधात असणार्‍यांना दिलासादायक दिवस. व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

नातेवाईकांना नाराज करू नका. दिवस माध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

समोरच्या व्यक्तीची साशंकता दूर कराल. आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

नवीन ओळखी वाढवाव्यात. भागीदारीतील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च दूर ठेवा. मुलांच्या जबाबदार्‍या पार पडण्यात दिवस निघून जातील. काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर