Aajche Rashi Bhavishya In Marathi 8 september 2025 : आज ८ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. प्रतिपदा तिथी रात्री ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज धृती योग रात्री ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच पूर्वाभाद्रपद नक्षत्र रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर आठवड्याची नवीन सुरुवात तुमच्या राशीची कशी असणार जाणून घेऊयात…

८ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi 8 september 2025 )

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

अनपेक्षित लाभ होतील. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

अचानक लाभाची शक्यता. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

सर्वांशी सामंजस्याने वागाल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

घरातील कामात आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

संभ्रमात कोणतेही काम करू नका. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

नवीन अधिकार हातात येतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर