Shadashtak Yog 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल ही केवळ आकाशातच नाही, तर आपल्या जीवनावरही खोल परिणाम करणारी असते. २०२५ मध्ये ३० वर्षांनंतर एक महत्त्वाचा आणि धोकादायक योग घडणार आहे. शनी आणि मंगळ यांच्यात होणारा ‘षडाष्टक योग’. २० जूनपासून मंगळ आणि शनी १५० अंशाच्या कोनात एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. ज्योतिषशास्त्रामध्ये या अवस्थेला ‘षडाष्टक योग’ म्हणतात, जो सहाव्या आणि आठव्या भावात तयार होतो. हा योग काही विशिष्ट राशींना धनहानी, वादविवाद, आरोग्याच्या समस्या आणि अपघात यांसारख्या संकटांकडे घेऊन जाऊ शकतो. या काळात कोणत्या राशींनी विशेष सावध राहणे अत्यावश्यक आहे पाहूयात…
शनी-मंगळ योगामुळे ३ राशी अडचणीत!
कर्क (Cancer)
कर्क राशीसाठी हा काळ मानसिक तणावाने भरलेला राहू शकतो. कार्यस्थळी अडचणी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आरोग्याच्या बाबतीत विशेषत: पोटदुखी किंवा रक्तदाब यासारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणावामुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. विनाकारण पैसे खर्च केल्याने तुमचे बजेट नंतर बिघडू शकते. करिअरमध्ये यश मिळणार नाही. काही लोकांना दिशाभूल करणारी बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी या काळात अडचणी वाढू शकतात. या राशीच्या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शरीरातील दुर्बलता जाणवेल. या काळात कुणालाही उधार देणे टाळा, पैसा अडकू शकतो. घरगुती वाद आणि क्रोधाचा उद्रेक तुमचे संबंध बिघडवू शकतो. एक मोठा फायदेशीर करार तुमच्या हातातून निसटू शकतो. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. प्रेम जीवनात चढ-उतार दिसून येऊ शकतात.
तूळ (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी खूप वाईट काळ सुरू होऊ शकतो. या काळात तुमची कुणाकडूनही फसवणूक होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. नोकरीशी संबंधित ऑफर जाऊ शकतात. आरोग्य खालावणे, कामाच्या ठिकाणी वादविवाद, घरातील सदस्यांशी मतभेद, अचानक खर्च आणि व्यापारात घट याचा अनुभव येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतो. या काळात मोठं आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)