Today’s Horoscope In Marathi, 24 July 2025 : आज २४ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावस्या आहे. अमावस्या उद्या रात्री १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. सकाळी ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत हर्षण योग जुळून येईल. संध्याकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार असणार आहे. त्याचप्रमाणे आज दर्श अमावस्या असणार आहे. आज दर्श अमावास्येला तुमची रास भाग्यशाली ठरणार का जाणून घेऊया…

२४ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope In Marathi, 24 July 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अति जोखीम पत्करू नका.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

झालेली चूक काबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लाडू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

नसत्या फंदात पडू नका. कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर