शारदीय नवरात्रीनंतर दशमी तिथीला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतांनुसार, याच दिवशी देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध केला होता. दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात, तसेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करणे शुभ मानले जाते.

कधी आहे दसरा?

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो. यावर्षी दशमी तिथी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी सुरू होऊन ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. उदयतिथीनुसार ५ ऑक्टोबरला विजयादशमी साजरी केली जाणार आहे.

तब्बल ५९ वर्षांनी तयार होत आहेत पाच शक्तिशाली राजयोग; उघडणार ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे दार

सूर्यास्तानंतरच का केले जाते रावणाचे दहन?

ज्योतिषशास्त्रानुसार, रावण दहन नेहमी सूर्यास्तानंतरच करावे. रावण दहनासाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे दसऱ्याची पूजाही सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करावी. असे मानले जाते की रावणाचे दहन केल्याने रोग, दोष, शोक, संकट आणि प्रतिकूल ग्रहस्थिती यांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी रावण दहन आवश्यक मानले जाते.

रावण दहनाची योग्य विधी

पूजेदरम्यान शमीची काही पाने तोडून आपल्या पूजा घरात ठेवा. यानंतर लाल कपड्यात अक्षदा, एक सुपारी आणि शमीची काही पाने टाकून त्याची पुडी बांधा. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीकडून ही पुडी घेऊन प्रभू श्रीरामाची प्रदक्षिणा केल्यास लाभ होतो, असे मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)