ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करून आपापसात युती करत असतात. ही युती काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरते तर काहींसाठी अशुभ. आता वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असून हा योग तीन राशींच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. यामुळे २०२३ मध्ये या लोकांना अचानक धनलाभ होण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या तीन राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

पंचांगानुसार ११ नोव्हेंबरला धनाचे देवता शुक्रदेव वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. यानंतर बुद्धी आणि व्यापाराचे कारक बुधदेव १३ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत संक्रमण करतील. त्याचबरोबर १६ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करतील. अशाप्रकारे वृश्चिक राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा फायदा पुढील तीन राशींना होणार आहे.

शनिदेवाच्या प्रभावामुळे ‘या’ लोकांना मिळू शकते नशिबाची साथ; २०२३ मध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची सुवर्णसंधी

  • मकर

या राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष फदायी सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या अकराव्या घरात हा योग तयार होणार आहे. या घराला उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. म्हणूनच हा योग तयार झाल्यामुळे या राशींच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रात असेही म्हटले आहे की या योगामुळे काही जोडप्यांना संतती प्राप्तीचे सुख मिळू शकते. इतकंच नाही तर या काळात या राशीच्या लोकांच्या सामाजिक प्रतिष्ठेत होण्याची संभावना आहे. नवा व्यापार सुरु करण्यासाठी हा कालावधी अनुकूल ठरू शकतो.

  • कुंभ

या राशीच्या कुंडलीतील दहाव्या घरात हा योग तयार होत आहे. या घराला व्यापार आणि नोकरीचे घर मानले जाते. म्हणूनच या काळात या राशीच्या लोकांना नोकरीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच काही लोकांना कार्यक्षेत्राच्या ठिकाणी नव्या जबाबदारीही मिळू शकतात. या कालावधीमध्ये या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील. तसेच अचानकच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात.

२४ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते; गुरुच्या राशी परिवर्तनामुळे मिळणार शुभ वार्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • मीन

मीन राशीच्या कुंडलीतील नवव्या घरात त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यापारात यश मिळू शकते. या काळात या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. रखडलेली सरकारी कामे यावेळी पूर्ण होऊ शकतात. तसेच शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे नवीन वाहन किंवा आलिशान वस्तू खरेदी करण्याची संभावना आहे. या काळात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)