दसरा २०२५: शारदीय नवरात्रीनंतर अश्विन शुक्ल पक्षाच्या शुद्ध पंधरवड्याच्या दहाव्या दिवशी दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याला दुर्गा विसर्जन केले जाते आणि संध्याकाळी रावण दहन केले जाते. दसऱ्याला शस्त्र पूजादेखील केली जाते. घरातील सर्व शस्त्रांची यावेळी पूजा केली जाते. तसंच या दिवशी देवी अपराजिताची देखील पूजा केली जाते. देवी अपराजिता यांच्या आशीर्वादाने व्यक्तीचे धैर्य आणि शौर्य वाढते आणि त्यांना यश मिळते. दसऱ्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या शस्त्र पूजनाबद्दल आणि त्याच्या महत्त्वाबाबत जाणून घेऊ…

दसऱ्याला शस्त्र पूजनाची वेळ

या वर्षी दसरा २ ऑक्टोबर रोजी आहे. अश्विन शुक्ल दशमी तिथी म्हणजेच दसऱ्याच्या दहाव्या दिवशी संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी असते. दसऱ्याच्या विजय मुहूर्तावर पूजा केली जाते. या वर्षी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत आहे. या काळात शस्त्रपूजा केली जाईल. शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त आहे.

२ शुभ योगात होईल शस्त्रपूजा

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेदरम्यान दोन शुभ योग निर्माण होतील. शस्त्रपूजेदरम्यान सुकर्म योग आणि धृती योग असे दोन योग निर्माण होतील. सुकर्म योग सकाळपासून रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत प्रभावी राहील. त्यानंतर धृती योग तयार होईल. रवि योग दिवसभर प्रभावी राहील. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेदरम्यान श्रावण नक्षत्र सकाळी ९.१३ ते मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहील.

दसऱ्याला शस्त्रपूजेची पद्धत

  • दसऱ्याला सर्व शस्त्रे गोळा करून, ती स्वच्छ करून एकाच ठिकाणी ठेवली जातात.
  • त्यानंतर सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून घ्या. मग त्यांना गंध, हळद-कुंकू लावा.
  • त्यानंतर फुले, अक्षता, शमीची पाने असे सर्व अर्पण करून शस्त्रांची पूजा केली जाते. यादरम्यान तुम्ही शस्त्र देवता पूजानम, रक्षाकर्ता पूजानम या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल.
  • शस्त्रपूजन करताना देवी अपराजिता यांना समर्पित ‘ओम अपराजिताय नम:’ या मंत्राचा जप करा. तिच्या आशीर्वादाने तुम्ही कायम विजयी व्हाल.

शस्त्र पूजेचे महत्त्व

भारतीय सैन्य दसऱ्याला शस्त्रपूजा करते. पूर्वीच्या राजांच्या काळातही शस्त्रपूजा केली जात असे. शस्त्रे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. शस्त्रपूजेच्या दिवशी पूर्वीच्या काळी राजे प्रगतीचे प्रतीक मानून राज्यांच्या सीमा ओलांडत कूच करत. या दिवशी केलेली पूजा विजय, धैर्य, यश आणि समृद्धी प्रदान करते. ती अधर्मावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. शस्त्रपूजा आपल्याला केवळ धार्मिकता आणि न्यायासाठी शस्त्रे वापरण्याची शिकवण देते.

Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.