scorecardresearch

Premium

‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात? चिडचिड व रागामागे असू शकतो ‘हा’ समज

Astrology: आज आपण अशा काही राशी पाहणार आहोत ज्या अनेकदा स्वतःची चूक असतानाही मान्य न करण्यासाठी ओळखल्या जातात, इतरांना दोष देण्याच्या या स्वभावाची काय कारणे असू शकतात हे सुद्धा जाणून घेऊया…

Five Zodiac Signs Who Never Admit When Wrong Instead Blames Others In Anger Check Rashi and Personality As Astrology Predictions
'या' ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Zodiac Signs Which Never Accept Fault: ऑफिसमध्ये, कुटुंबात अनेकदा अशी काही मंडळी असतात जी तुम्हाला त्यांच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे खूप मनस्ताप देत असतात. या लोकांच्या हेतूमध्ये दोष नसला तरी स्वभाव काही वेळा इतरांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा निरनिराळी असतात. राशीवर ज्या ग्रहाचा प्रभाव असतो त्यानुसार वागणुकीत विशेष फरक अधोरेखित करता येऊ शकतात. नावानुसार, मूलांकानुसार व राशीनुसार तुम्हीही एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावामागील अर्थ समजून घेऊ शकता, जेणेकरून स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी अशा मंडळींशी कसे वागावे हे आपल्याला समजून घेता येऊ शकते. आज आपण अशा काही राशी पाहणार आहोत ज्या अनेकदा स्वतःची चूक असतानाही मान्य न करण्यासाठी ओळखल्या जातात, इतरांना दोष देण्याच्या या स्वभावाची काय कारणे असू शकतात हे सुद्धा जाणून घेऊया…

‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात?

कन्या (Virgo Zodiac)

या राशीची मंडळी ही जन्मतःच प्रत्येक गोष्टींमध्ये परफेक्शनिस्ट बनण्यासाठी इच्छुक असू शकतात. अनेकदा याच स्पर्धेत त्यांची भावनिक बाजू काहीशी दडवून ठेवली जाते. एखाद्याचा राग आल्यास ही मंडळी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यासाठी खूप वेळ घेऊ शकतात. त्यांनी काही वेळा स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली असते की त्यांना आपल्यावर इतरांनी केलेली टीका म्हणजे मेहनतीचा अपमान वाटू शकतो. म्हणूनच ते काही घटनांमध्ये चूक असूनही त्यांना समोरच्याचं बोलणं टीका वाटण्याची शक्यता अधिक असते.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

सिंह (Leo Zodiac)

नावाप्रमाणेच सिंह राशीची मंडळी मानी व राजेशाही जीवन जगण्याची इच्छा मनी बाळगतात. त्यांना अनेकदा चूक दाखवून देणाऱ्याचा राग येऊ शकतो त्यामुळे ते चूक माहीत असूनही मान्य करणे टाळू शकतात. या मंडळींना इतरांसमोर आपण दुबळे पडू अशी भीती असू शकते ज्यामुळे ते आपला मान राखून ठेवण्यासाठी स्वतःचा दोष इतरांच्या माथ्यावर मारू शकतात.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपण चुकू शकतो यावर अनेकदा विश्वासच बसत नाही. अशा व्यक्ती राग सोडूनही देत नाहीत ज्यामुळे वाद वाढू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या संयमी असल्याने त्या थेट आपली चूक मान्य करत नसल्या तरी इतरांना दोष देण्याचे प्रमाण खूप कमी असू शकते. उलट अशा व्यक्ती टीकाकाराला शब्दात पकडण्यासाठी वाट पाहून मग पलटवार करण्याची संधी शोधण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

मेष (Aries Zodiac)

मेष राशीच्या मंडळींना चारचौघात केलेला अपमान अजिबात सहन करता येऊ शकत नाही. त्यांना चूक दाखवून देण्यासाठी सुद्धा इतरांना शांत व संयमी मोडमध्ये राहणे आवश्यक ठरू शकते. अन्यथा ते चांगल्यासाठी सांगितलेली गोष्ट ही नकारात्मक रित्या मनात साठवून ठेवू शकतात. त्यांना तुम्ही त्यांचे कौतुक केल्यास किंवा चूक अप्रत्यक्ष लक्षात आणून दिल्यास वाईट वाटण्याचे प्रमाण कमी असू शकते पण थेट वार केल्यास या व्यक्ती लगेच समोरच्यावर दोष टाकून मोकळ्या होऊ शकतात.

हे ही वाचा<< ७ जुलैपर्यंत ‘या’ राशींना धनाची कमीच पडणार नाही? लक्ष्मी राजयोग बनवू शकतो कोट्यधीशांचे मालक

कुंभ (Aquarius Zodiac)

संयमाची कमी असल्याने ही रास प्रचंड ज्ञानी असूनही अनेकदा स्वतःला व इतरांना मनस्ताप देऊ शकते. त्यांची अशी धारणा असते की, आपण कधीच खोटे बोलत नाही आणि बहुतांश घटनांमध्ये हे सत्यही असू शकते. पण काही वेळा पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे अंदाज चुकू शकतात. यावेळी आपण खोट्यात पडू नये म्हणून हे लोक चूक अमान्य करण्याची शक्यता असते. या मंडळी चूक मान्य न करताही प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर अधिक भर देतात. यामुळे समोरच्याला काहीवेळा कुंभ राशीच्या लोकांचा राग येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती वर साधारण निरीक्षणावर आधारित आहे, यास दावा समजू नये)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five zodiac signs who never admit when wrong instead blames others in anger check rashi and personality as astrology predictions svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×