सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो, ज्यामुळे त्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दीर्घकाळ टिकतो. शास्त्रात शनिदेवाला कर्म दाता मानले गेले आहे. चांगले कर्म करणार्‍यांना शनि शुभ फळ देतो आणि वाईट कर्म करणार्‍यांना अशुभ फळ देतो. वर्ष २०२२ मध्ये शनिने २९ एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश केला, त्यानंतर प्रतिगामी होऊन शनिने १२ जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे.

अशा प्रकारे शनिदेव १४५ दिवस मकर राशीत राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत, शनि मागच्या दिशेने भ्रमण करेल. मकर राशीत शनि सुमारे ५ महिने राहील. यानंतर, ७ जानेवारी २०२३ रोजी, तो कुंभ राशीमध्ये प्रवास सुरू करेल. शनि सुमारे ३ महिने प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करेल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी शनिचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • मेष

ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीतील प्रतिगामी शनि तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण व्यवसाय आणि नोकरीचे घर मानल्या जाणाऱ्या तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या घरात शनि ग्रह प्रतिगामी आहे. त्यामुळे या काळात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. यासोबतच तुमची कार्यशैलीही यावेळी सुधारेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते.

Vastu Tips : स्वस्तिक बनवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल

  • मीन

शनि मकर राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव या राशीतून अकराव्या घरात परतले आहेत. जो ज्योतिषशास्त्रात उत्पन्न आणि लाभाचा कारक मानला जातो. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच, आपण उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे कमवू शकता. या काळात नवीन व्यावसायिक संबंध तयार होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • धनु

शनिदेवाच्या प्रतिगामीपणामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. कारण शनिदेव या राशीच्या संक्रमण राशीपासून दुसऱ्या भावात मागे गेले आहेत. ज्याला ज्योतिषशास्त्रात धन आणि वाणीचे घर मानले जाते. त्यामुळे यावेळी या राशीचे लोक शेअर बाजारमध्ये चांगला नफा कमवू शकता. यासोबतच या काळात अडकलेले पैसेही मिळू शकतात. व्यवसायात चांगला लाभ होण्याची चिन्हे आहेत. तर ज्याचे कार्यक्षेत्र भाषणाशी संबंधित आहे. अशा लोकांसाठी वेळ फायदेशीर राहील.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)