Shravan Shivratri 2025 Rajyog: आजपासून काही राशींचं नशीब इतकं झपाट्यानं पालटणार आहे की, विश्वास ठेवणं कठीण जाईल. २३ जुलै रोजी श्रावण शिवरात्रीच्या पवित्र दिवशी एक अत्यंत प्रभावशाली आणि शुभ गजकेसरी राजयोग तयार होत आहे. गजकेसरी राजयोग गुरू आणि चंद्राच्या युतीतून तयार होतो. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग हा अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेला आहे. या योगाचा परिणाम काही विशिष्ट राशींवर विशेषरूपाने जाणवणार असून, त्यांच्या जीवनात अपार यश, मान-सन्मान आणि अचानक धनलाभाची शक्यता निर्माण झाली आहे. पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी ज्यांचे भाग्य गजकेसरी राजयोगामुळे पलटणार आहे.
गजकेसरी योगामुळे ‘तीन’ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात होणार लाभ!
कन्या (Virgo)
गजकेसरी राजयोगाच्या या कालावधीत कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्म भावात हा राजयोग होत असल्यामुळे नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. प्रलंबित काम लवकर पूर्ण होऊ शकतील. बेरोजगारांना नोकरीच्या उत्तम ऑफर्स मिळू शकतात. प्रवास लाभदायक ठरेल आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी प्रतिभा दाखविण्याची संधी मिळू शकेल. आदर मिळू शकेल. जोडीदाराशी संबंध अनुकूल राहतील.
तूळ (Libra)
हा योग भाग्य स्थानात बनत असल्याने तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचे संकेत आहेत. व्यवसायात हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ ठरू शकेल. प्रवासातून यश मिळेल आणि भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष नफा मिळू शकतो. परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. विविध स्रोतातून आर्थिक प्राप्ती होऊ शकते. आर्थिक आवक चांगली राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होऊ शकेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. मान-सन्मान, आदर वाढू शकेल.
मीन (Pisces)
हा योग मीन राशीसाठी चतुर्थ भावात होत आहे. त्यामुळे घर, जमीन, गाडी इत्यादी सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर काळ अनुकूल ठरू शकेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. व्यवसायात भरभराट होईल. नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत आपली आर्थिक स्थिती उत्तम राहू शकेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)