या वर्षीचा ऑगस्ट महिना हिंदू धर्मासाठी खूप खास मानला जात आहे, कारण या महिन्याची सुरुवात श्रावण महिन्यापासून होत आहे. तसेच या महिन्यात अनेक मोठे सण येत आहेत. दुसरीकडे, या महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. सूर्य, बुध, मंगळ, शुक्र, चंद्र यांच्यात होणाऱ्या बदलामुळे अनेक शुभ योगही तयार होत आहेत. अशातच आता या महिन्यात गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. ज्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे, हा योग शुभ राजयोग मानला जातो. हा योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो, तसेच काही लोकांना व्यवसायातही यश मिळू शकते. तर ऑगस्ट महिन्यात बनत असलेल्या गजकेसरी योग कोणत्या राशींना विशेष लाभ देणार ते जाणून घेऊया.

गजकेसरी योग कधी तयार होणार?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे एक खास योग तयार होत आहे. यावेळी गुरु मेष राशीत विराजमान आहेत. त्याच वेळी, चंद्र ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल आणि ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ४३ .43 मिनिटांपर्यंत राहणार आहे.

‘या’ राशींना गजकेसरी राजयोग तयार झाल्याने लाभ होण्याची शक्यता –

मेष –

मेष राशीतच गजकेसरी राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. तसेच नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते, प्रमोशन आणि पगारवाढही होऊ शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात, अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कर्क –

गजकेसरी योग कर्क राशीच्या लोकांचे नशीब उघडू शकतो. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रचंड यशासह आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतो. तसेच तुम्हाला यश आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकेल.

हेही वाचा- भद्र राजयोग तयार होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बुधाच्या आशीर्वादाने अमाप पैसा मिळण्याची शक्यता

मकर –

मकर राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग आनंद देणारा ठरु शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासह नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर या काळात खरेदी करु शकता. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो, रखडलेले पैसे परत मिळू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)