Guru-Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्राचा २६ जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश होईल. या राशीत आधीपासून गुरू ग्रह विराजमान असल्याने शुक्राच्या या परिवर्तनामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. मिथुन राशीत हा योग तब्बल १२ वर्षांनंतर निर्माण होणार आहे.

पंचांगानुसार, २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

‘या’ राशींवर पडणार गजलक्ष्मी योगाचा प्रभाव

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी योगाचा प्रभाव खूप सकारात्मक असेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीसाठी हा योग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुम्ही अनेक गोष्टी साध्य कराल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ (Kumbh Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही गजलक्ष्मी योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)