वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. तर काही ग्रह वक्री आणि मार्गी होतात. अशातच आता गुरू, सूर्यासह ३ ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरला शुक्र कर्क राशीत मार्गी होणार तर गुरु मेष राशीत वक्री होणार आहे. दुसरीकडे १६ सप्टेंबरला बुध सिंह राशीत जाणार आहे आणि १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. महिन्याच्या शेवटी २४ सप्टेंबरला ग्रहांचा अधिपती मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. या ग्रहांच्या हालचालीचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे नशीब या काळात चमकू शकते. तसेच करिअर आणि व्यवसायातही प्रगती होऊ शकते. तर या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
धनु रास (Dhanu Zodiac)
गुरु, सूर्यासह ३ ग्रहांच्या चालीतील बदल धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. शिवाय प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळू शकते. या काळात तुम्ही प्रवास करू शकता जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते.
मकर रास (Makar Zodiac)
ग्रहाची चालीतील बदल मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळू शकते आणि तुमच्या इच्छेनुसार शुभ परिणाम प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. तुम्ही काही नवीन लोकांशी संबंध जोडू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.
मिथुन रास Mithun Zodiac)
गुरु, सूर्यासह ३ ग्रहांच्या चालीतील बदल तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. तुमच्या बोलण्यात परिणाम दिसून येईल. ज्यामुळे लोक तुमच्यावर इम्प्रेस होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जे व्यवसाय करतात त्यांना यावेळी नवीन ऑर्डर मिळू शकतात. त्यामुळे चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)