Gajlaxmi Rajyog: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि ग्रहांची युती यास फार महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा ग्रहांची युती होते. ज्योतिषशास्त्रानुसार, १ मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर १९ मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. यामुळे वृषभ राशीत गुरू आणि शुक्राचा संयोग होऊन ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होणार आहे. ज्यावेळी गुरु आणि शुक्र मध्यभागी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या घरात असतात, तेव्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गजलक्ष्मी राजयोगाचा प्रभाव खूप शुभ असतो. या योगाचे आगमन अनेक राशींसाठी भाग्यवान काळ आणते. जाणून घेऊया गजलक्ष्मी राजयोगाने कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते.

‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप फलदायी ठरु शकतो. या राशीच्या लोकांना व्यापारात बक्कळ नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीची चिन्हे आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

(हे ही वाचा : मार्चमध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन? १८ महिन्यांनंतर सूर्य-मंगळाची युती होताच लक्ष्मी येऊ शकते दारी)

कर्क राशी

गजलक्ष्मी राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना ते परत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळू शकते.

सिंह राशी

गजलक्ष्मी राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. सर्व प्रकारच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते.

(हे ही वाचा : होळीनंतर ७ दिवसांनी ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? राहू-शुक्रदेवाची युती होताच लक्ष्मी कृपेने मिळू शकतो अपार पैसा )

तूळ राशी

गजलक्ष्मी राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी उत्पनाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल, तर तिथून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते.

धनु राशी

गजलक्ष्मी राजयोगामुळे धनु राशींच्या लोकांचे सुखाचे दिवस येऊ शकतात. व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. पैशाची आवक वाढू शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. वाहनाचे सुख मिळू शकते. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची देखील शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)