Guru Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु एका राशीत एका वर्षासाठी संक्रमण करतो, तर तो एका नक्षत्रात एका महिन्यासाठी म्हणजेच ३० दिवस राहतो. वैदिक कॅलेंडरच्या गणनेनुसार, २८ जून २०२५ रोजी दुपारी २:४३ वाजता, गुरुदेव आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात संक्रमण करतील, जिथे ते १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३९ पर्यंत राहतील. २८ जूनपूर्वी, १४ जून २०२५ रोजी दुपारी १२:०७ वाजता, गुरुदेव आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणात संक्रमण करतील. आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू आहे, जो एक छाया ग्रह आहे, यामुळे गुरु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने सर्व राशींवर याचा परिणाम होणार आहे. यामधल्या लकी राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

गुरुचे नक्षत्र गोचर : ‘या’ राशींना लाभच लाभ?

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या काळात रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफादेखील मिळू शकतो. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते.

सिंह

गुरु ग्रह नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे.

धनू

गुरु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने धनू राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)